बीजिंग -सिक्कीमचा वाद सुरू असतानाच चीनने बुधवारी तिबेटमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सशस्त्र वाहनांचा ताफा तैनात केला आहे. या ताफ्यासह अत्याधुनिक लष्करी उपकरणे सुद्धा सीमेवर पाठवण्यात आली आहेत. चीनच्या स्थानिक माध्यमांनी बुधवारी यासंदर्भातील वृत्त जाहीर केले. 16 जूनपासून सिक्कीमच्या डोकलाम परिसरावरून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहेत. अशात तिबेटमध्ये 11 तासांच्या लाईव्ह युद्धसरावानंतर भारताला चीनची ही दुसरी चिथावणी मानली जात आहे.
– चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, तिबेट आणि शिनजियांग प्रांतात अशांतता पसरली आहे. त्यावर नजर ठेवण्यासाठी चीनने क्युनलुन डोंगरावर लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
– चीनने ही कारवाई गेल्या महिन्यातही लष्कर पाठवले होते. त्या ठिकाणी रस्ते बांधकाम सुरू असताना काही अडथळे येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी ही तैनाती आहे असा दावा चीनने केला.
– विशेष म्हणजे, सोमवारीच चीनने तिबेटमध्ये 11 तासांचा युद्ध सराव केला. डोकलाम परिसरात भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असतानाच हा सराव झाला. त्यातच तिबेटमध्ये सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय म्हणजे, चीनची दुसरी चिथावणी असल्याचे म्हटले जात आहे.